श्रीविद्याअखंडमहायोग परंपरेतील सर्व साधक-साधिका, तसेच सनातन धर्मनिष्ठ, श्रद्धावान भाविक आणि सद्गुरुभक्त यांना अत्यंत आनंदाने कळविण्यात येते की, भगवान वेदव्यास पौर्णिमा अर्थात श्रीगुरुपौर्णिमा महापर्व यावर्षी बुधवार, दिनांक २९ जुलै २०२६ (आषाढ शुद्ध पौर्णिमा, शके १९४८) रोजी साजरे होत आहे.
या पावन आणि मंगलमय पर्वानिमित्त अनंतश्रीविभूषित परमपूज्य श्रीगुरुदेव श्रीनिवासजी यांच्या पावन दर्शनाचा विशेष सोहळा श्रीविद्याअखंडमहायोग सत्संग सभेच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे.
या दिवशी इच्छुक साधक-भाविकांना परमपूज्य श्रीगुरुदेवांच्या कृपेने मंत्रदीक्षा ग्रहण करण्याचीही सुवर्णसंधी लाभणार आहे.
🌼 दर्शन व मंत्रदीक्षा
📅 दिनांक: बुधवार, २९ जुलै २०२६ 🕗 वेळ: सकाळी ८.०० ते दुपारी १.००
📍 स्थळ
जामगोंडी लॉन्स आसरा ब्रिजजवळ, जुळे सोलापूर, सोलापूर
हा पावन दर्शन सोहळा सर्वांसाठी खुला असून, सर्व श्रद्धावान भाविकांनी या दिव्य सत्संग, दर्शन व कृपाप्रसादाचा लाभ घ्यावा, ही नम्र विनंती.