
फोटो गॅलरी
गुरु पौर्णिमा - २०२५
गुरुवार, दिनांक १० जुलै २०२५ रोजी, गुरुपौर्णिमेच्या महापर्वानिमित्त, श्रीविद्याअखंडमहायोग परंपरेतील दीक्षित साधक-साधिकांसह, सश्रद्ध हिंदू, जिज्ञासू आणि भाविक भक्तांसाठी पूज्य अखंडमहायोगी परमपूज्य श्रीगुरुदेव श्रीनिवासजी काटकर यांचा भव्य दर्शन सोहळा आयोजित करण्यात आला होता. या पावन प्रसंगी, पूज्य श्रीगुरुदेव श्रीनिवासजी यांनी चिरंजीव अनिरुद्ध काटकर यांना आपला आध्यात्मिक उत्तराधिकारी म्हणून प्रतिष्ठित केले आणि त्यांना ‘अनिरुद्ध सिद्धाचार्य’ हे नामाभिधान प्रदान केले.
मोहिनी एकादशी - २०२५
मोहिनी एकादशीच्या या पुण्यपर्वानिमित्त परमपूज्य श्रीगुरुदेव श्रीनिवासजींच्या दर्शनाचा मंगल सोहळा गुरुवार, दिनांक ८ मे २०२५ रोजी, त्यांच्या निवासस्थानी श्रीविद्या अखंड महायोग सत्संग सभेच्या वतीने आयोजित करण्यात आला. याच पावन मोहिनी एकादशीच्या दिवशी, पूज्य श्रीगुरुदेव श्रीनिवास सिध्दाचार्य यांना त्यांच्या सद्गुरु श्री ईश्वरशास्त्री दीक्षित यांच्याकडून श्रीविद्या महायोग परंपरेतील सर्वोच्च असे आचार्यपद प्राप्त झाले आणि त्यांना अखंड साधनाधिकार प्रदान करण्यात आला.
आळंदी साधना शिबिर - २०२५
श्रीविद्या अखंड महायोग सत्संग सभेच्या वतीने, देवाची आळंदी येथे २५ व २६ एप्रिल २०२५ रोजी श्रीविद्या अखंड महायोग साधकांसाठी दोन दिवसीय साधना शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन परमपूज्य श्रीगुरुदेव श्रीनिवासजी यांच्या पावन हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी साधकांसाठी दक्षिणामूर्ती मंत्रमाला स्तोत्र प्रकट करून त्याचे सामूहिक पठण घडवून आणले.
महाशिवरात्रीचा कार्यक्रम – २०२५
बुधवार, दिनांक २६ फेब्रुवारी २०२५, महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर श्रीविद्या अखंड महायोग सत्संग सभेच्या वतीने परमपूज्य श्रीगुरुदेव श्रीनिवासजींच्या दर्शन, भजन, सत्संग आणि शिवशक्ती ध्यान दीक्षेचा भव्य सोहळा सायंकाळी ६ ते रात्री १०.३० वाजेपर्यंत पद्मावती कन्व्हेंशन हॉल, सोलापूर येथे आयोजित करण्यात आला होता. या विशेष सोहळ्यात जवळपास दोन हजाराहून अधिक भाविक, भक्त, जिज्ञासू आणि साधकांनी उत्साहाने भाग घेतला.
मकर संक्रांती - २०२५
मकर संक्रांतीच्या या पावन पर्वावर परमपूज्य श्रीगुरुदेव श्रीनिवासजींनी श्रीविद्याअखंडमहायोग साधनक्रमामध्ये दीक्षित झालेल्या भाविक भक्त, जिज्ञासू साधक-साधिकांना तसेच श्रीगुरुदेवांचे दर्शन घेण्याची इच्छा असलेल्या सर्वांना मंगल दर्शन दिले.
गुरु पौर्णिमा - २०२४
सोलापूर शहरातील गुरुदेव श्रीनिवासजी शामराव काटकर यांच्या पवित्र उपस्थितीत, जुळे सोलापूर भागातील चंद्रलोक नगर येथील श्रीविद्या महायोग अभ्यासकेंद्र येथे व्यास पौर्णिमा मोठ्या धूमधामाने साजरी करण्यात आली. अत्यंत शिस्तबद्ध आणि पावित्र्यपूर्ण रीतीने आयोजित केलेला दर्शन सोहळा यशस्वीपणे पार पडला. या कार्यक्रमात जवळपास सहा हजार भाविकांनी रांगेत उभे राहून दर्शन घेतले. या विशेष कार्यक्रमाचे आयोजन श्रीविद्या महायोग सत्संग सभेने केले होते.